IMPIMP

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले- ‘छोट्या-छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठं आहेत ? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?’

by sikandershaikh
devendra fadanvis-anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर निशाणा साधला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठं आहेत ? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत असे सवाल त्यांनी केले आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरू आहे हे गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरूय जनतेला कळायला हवं’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे.
हरेक दिवशी नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लीप बाहेर येत आहेत.
अशा स्थितीत पोलीस हातावर हात ठेवून गप्प आहेत.
पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरू आहे हे राज्याच्या जनतेला कळायला हवं.

‘छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठं आहेत ? ते यावर का बोलत नाहीत ?’

पुढं बोलताना फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठं आहेत ? पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत.
तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे ते जनतेला का सांगत नाहीत.
त्या ऑडिओ क्लीपमधील आवाज कोणाचा आहे हे पोलीस का सांगत नाहीत किंवा पडताळून पहात नाहीत असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.

‘कोणतंही प्रकरण असो वरोधी पक्ष कायम आक्रमक राहिल’

इतकंच नाही तर संजय राठोड प्रकरण असो किंवा इतर कोणतंही प्रकरण असो वरोधी पक्ष कायम
आक्रमक राहिल असा इशाराही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावेळी बोलताना दिला.

सरकारी नोकरीतील निवडीच्या पात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्वाचा आदेश

Related Posts