IMPIMP

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

by nagesh
Devendra Fadnavis | over mumbai sakinaka rape case maharashtra opposition leader devendra fadnavis slam maharashtra govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Devendra Fadnavis | महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबापुरीत साकीनाका भागात टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार (Mumbai Sakinaka Rape Case) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आरोपीने महिलेला रॉडसारख्या वस्तुने जखमी केले. या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला आहे. कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मुंबापुरीत साकीनाका भागात शुक्रवारी सकाळी मोहन चव्हाण या आरोपीने टेम्पोमध्ये एका महिलेवर अत्याचार केला.
त्यानंतर खैरानी रोडवर मोहन महिलेला मारहाण करत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यावेळी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे समजते मोहन चव्हाण याला अटक करण्यात आली असून याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

 

दरम्यान या घटनेवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले.
मुंबईतील कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा प्रश्न उपस्थित केला.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

Web Title : Devendra Fadnavis | over mumbai sakinaka rape case maharashtra opposition leader devendra fadnavis slam maharashtra govt

 

हे देखील वाचा :

Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्हा हादरला ! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या आईवर सपासप वार करून केला खून

Rajyasabha Congress | राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या 6 नेत्यांची जबरदस्त ‘फिल्डिंग’

 

Related Posts