IMPIMP

Rajyasabha Congress | राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या 6 नेत्यांची जबरदस्त ‘फिल्डिंग’

by nagesh
Rajyasabha Congress | congress fielding 6 leaders rajiv satavs seat rajyasabha

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rajyasabha Congress | राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक (Rajyasabha Congress) जाहीर केली आहे. यामध्ये राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील एका जागेचाही यात समावेश आहे. या एका जागेसाठी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सहा नेते इच्छुक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मिलिंद देवरा (milind devda) यांचेही नाव आघाडीवर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकी १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार असून दि २३ ला छानणी होईल.
तर दि २७ पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेता येणार आहे.
४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.

 

दिवंगत राजीव सातव यांच्या जागेची मुदत २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे.
या एकाच जागेसाठी काँग्रेस यामधील सहा नेते इच्छुक आहेत.
यामध्ये मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार,
अनंत गाडगीळ यांचा समावेश आहे.
दरम्यान, तामिळनाडू किंवा महाराष्ट्रातून गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Rajyasabha Congress | congress fielding 6 leaders rajiv satavs seat rajyasabha

 

हे देखील वाचा :

Check Books | 1 ऑक्टोबरपासून निरूपयोगी होतील ‘या’ तीन बँकांचे चेकबुक, तुमच्या बँकेची माहिती तपासून पहा

Pimpri Rape Case | ‘मी ACP आहे, माझं कोणी काही करु शकत नाही’, असं म्हणत 38 वर्षाच्या शिक्षिकेवर बलात्कार

 

Related Posts