IMPIMP

माजी खासदार आढळराव पाटील यांची सोशल मीडियावर बदनामी; खा. डॉ. कोल्हे यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल.

by pranjalishirish
Former MP Adhalrao Patil's notoriety on social media; MP Dr. Filed a case against Kolhe's brother

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  Adhalrao Patil  यांच्यावर गलिच्छ व एकेरी भाषेत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचे खरे सूत्रधार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तात्काळ माजी खासदार आढळराव पाटील  Adhalrao Patil यांची जाहीर माफी मागावी; अन्यथा आंदोलन करु, असा इशारा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला आहे.

याबाबत माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले, औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन डॉ. कोल्हे यांनी केवळ नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे, अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना जनतेने खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. त्यातच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त ट्रोल करत या कामाचे श्रेय आढळराव पाटील  Adhalrao Patil  यांना दिल्याने खासदार डॉ. कोल्हे यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांनी त्यांचा सख्खा भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्याकडून अतिशय हीन पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत शिव्यांची लाखोली वाहून माजी खासदार आढळराव पाटील यांची बदनामी सोशल मिडीयाद्वारे सुरु केली असल्याचे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts