IMPIMP

Bhandup Fire : ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’; भाजपची टीका

by pranjalishirish
hospital fire bjp has criticized thackeray government over bhandup fire incident

मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये कोरोनावरील उपचारासाठी सनराईज रुग्णालय सुरु करण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयाला काल (शुक्रवार) आग लागली. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. तर पाचजण गंभीर जखमी आहे. तसेच या रुग्णालयाच्या शवागारात दोन मृतदेहही होते. या आगीच्या मुद्यावरून भाजपकडून ठाकरे सरकारवर Thackeray government  टीका करण्यात येत आहे.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

भांडुप पश्चिमेकडील तीन मजली ड्रीम्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयास गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये जीवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता भाजपने ट्विट करत ठाकरे सरकारवर Thackeray government  निशाणा साधला. त्यामध्ये भाजपने म्हटले, की ‘भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत 12 रुग्ण दगावले. ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! तसेच भंडारा दुर्घटनेनंतरही एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा व्यवस्था बसवण्यात आली नाही. ठाकरे सरकारच्या Thackeray government  ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’.

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदतही जाहीर केली. त्यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्घटनास्थळी भेट दिली.

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

भंडाऱ्यातही मोठी दुर्घटना

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातही रुग्णालयात यापूर्वी अशाच प्रकारे आग लागली होती. त्यामध्ये अनेक नवजात बालक दगावले होते. ही घटना ताजी असतानाच आता भांडुप येथे रुग्णालयाला आग लागली.

Also Read

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

Related Posts