IMPIMP

खा. नवनीत राणांचा सवाल, ‘एकट्या मुंबईतून 100 कोटी तर राज्यातून किती?’

by pranjalishirish
Amravati Love Jihad Case | serious allegations of a girl on navneet rana in amravati love jihad case

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि नवनीत राणा यांच्यामध्ये वाद झाले होते. हा वाद चांगलाच पेटला आहे. आता नवनीत राणा Navneet Rana  यांनी थेट शिवसेनेला लक्ष्य केले आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत होते. मात्र, त्यांच्यानंतर शिवसेनेत महिलांचा आदर संपला, अशी टीका नवनीत राणा यांनी अरविंद सावंत प्रकरणावर संसदेत बोलताना केली.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. या लेटर बॉम्बमुळे एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संसदेत देखील उमटले आहेत. 100 कोटींच्या वसुलीचे काम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच होत असल्याचा खळबळजनक आरोप नवनीत राणा Navneet Rana यांनी केला होता आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

नवनीत राणा Navneet Rana  म्हणाल्या, जो व्यक्ती सोळा वर्षे निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळी भाजपचे सरकार होते त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्या दिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझे यांना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटवण्यात आले, असे राणा यांनी म्हटले.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

राणा पुढे म्हणाल्या, जर अशा प्रकारे खंडणी वसुल करण्याचे काम होत असेल तर संपूर्ण देशातही असे होऊ शकते. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन हे सर्व सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसुल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून जर 100 कोटी रुपयांची वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल ? असा प्रश्न उपस्थित करुन नवनीत राणा यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

Nana Patole : ‘पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनाम द्यायला सांगा आणि चौकशी करा’ !

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

 

Related Posts