IMPIMP

Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का

by nagesh
Jalgaon Politician | jalgaon district bank election gulabrao patil girish mahajan and eknath khadse at a joint meeting

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन राजकारणात काहीही अशक्य नसत हे सर्वज्ञात आहे. त्याचीच प्रचिती जळगावमध्ये (Jalgaon Politician) आली. निमित्त होते ते जिल्हा बँक निवडणुकीचे. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये चांगलाच राजकीय आखाडा पाहायला मिळाला. भाजपचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं (Shivsena) पार पोखरून काढला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. मात्र, जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र आल्याचे पाहून जळगावकरांना (Jalgaon Politician) आश्चर्याचा धक्का बसला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन (BJP Girish Mahajan), राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे,
माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar), भाजप आमदार सुरेश भोळे (BJP Suresh Bhole), काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेना आमदार किशोर पाटील,
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे (Jalgaon Politician) यांच्या उपस्थित बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार गिरीश महाजन यांनी एखादी दुसरी जागा वगळता हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एकमत झाल्याचे सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे चारही पक्ष एकत्रितपणे लढविणार आहे.
बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद प्रत्येक पक्षाला सव्वा वर्षे मिळेल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, गेल्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलने जिल्हा बँकेत यश मिळविले.
त्यावेळी सहकारात राजकारण असू नये हि भूमिका विचारात घेतली होती.
याहीवेळी तीच भूमिका आहे. रोहिणी खडसे यांनी चांगले नेतृत्व केल्यामुळे बँक उर्जीतावस्थेला आली असून आगामी निवडणूक देखील सर्वपक्षीय पॅनल करून लढविण्यात येणार आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला चांगलाच दणका दिला होता. भाजपच्या ११ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे.
हे ११ नगरसेवक आधी एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. त्यानंतर हसत खेळत तिन्ही नेते समोरासमोर आल्याने सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला.

 

Web Title : Jalgaon Politician | jalgaon district bank election gulabrao patil girish mahajan and eknath khadse at a joint meeting

 

हे देखील वाचा :

Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’

Supreme Court | पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक ‘सेक्स’ करणं ही क्रूरता – सुप्रीम कोर्ट

 

Related Posts