IMPIMP

Supreme Court | पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक ‘सेक्स’ करणं ही क्रूरता – सुप्रीम कोर्ट

by nagesh
OBC Political Reservation In Maharashtra | obc reservation decision for 92 municipal councils postponed special bench to be constituted for hearing

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल असलेल्या एका याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने स्वत: च्या बायकोसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणं ही क्रूरता असल्याचे म्हटले आहे. तसेच हा एक गंभीर गुन्हा असल्याचं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

हे प्रकरण दोन वर्षापूर्वीचे असून 2019 मध्ये हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यात (Bhiwani District Haryana) प्रदीप नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR)दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा त्याच्याच मेव्हण्याने दाखल केला होता. त्याच्या बहिणीने प्रदीपच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली होती. त्यामुळे हुंडा मागणे, मारहाण करणे, अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे
असे गुन्हे प्रदीवर दाखल करण्यात आले होते. या प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) झाली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice N. V. Ramanna), न्यायमूर्ती सूर्य कांत (Justice Surya Kant) आणि न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli)
यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रदीपने आपल्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

 

 

 

न्यायालयाने म्हटले की, भारतीय दंडविधानाच्या कलम 377 अन्वये बलात्कार किंवा जबरदस्तीने केलेला अनैसर्गिक लैंगिक संबंध हा एक गंभीर गुन्हा (Serious crime) आहे.
यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपीवर कोणतीही दयामाया दाखवता येणार नाही. आम्हाला हे ठाऊक नाही की पोलीस काय करत आहेत.
या आरोपीने हुंडा मागितला, तो मिळाला नाही म्हणून पत्नीला मारहाण केली. तिचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात टाकून तिला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले. यानंतर पीडित महिलेने आत्महत्या (Committed suicide) केली.
यामुळे आरोपी हा दयेस पात्र नाही, कारण हा एक क्रूर अपराध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे.
त्याला जामीन मिळाला नाही तर त्याची नोकरी धोक्यात येईल.
त्यावर अशा लोकांची नोकरी गेली तर हे योग्यच होईल, त्यामुळे अशांची योग्य जागा ही तुरुंग आहे.
असं म्हणत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला (Bail application rejected).

 

Web Title : Supreme Court | forcefully physical relationship with wife is cruelty says supreme court of india

 

हे देखील वाचा :

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

Deglur By-Election | देगलूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ

 

Related Posts