IMPIMP

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

by pranjalishirish
karnataka : woman files complaint against bjp leader ramesh jarkiholi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कर्नाटकातील भाजप नेते आणि बेळगावचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना अश्लील व्हिडीओ प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता या व्हिडीओतील तरुणीनं जारकीहोळी यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जारकीहोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. आपल्या वकिलामार्फत संबंधित तरुणीनं पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे.

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

सदर तरुणीच्या वकिलांनी पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेतली. तरुणीनं लिहिलेली तक्रार त्यांनी आयुक्तांकडे दिली आहे. यानंतर या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कबॉन पार्क पोलीस ठाण्यात जारकीहोळी Ramesh Jarkiholi  यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. धमकावणं, लैंगिक छळ, फसवणूक, अपमान करणं अशा गंभीर गुन्ह्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

एका अश्लील व्हिडीओमुळं जारकीहोळी  Ramesh Jarkiholi अडचणीत सापडले होते. या प्रकरणावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळं आता कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारसमोर नवं संकट निर्माण झालं आहे. अनेक दाक्षिणात्य वाहिन्यांवर जारकीहोळी यांचा व्हिडीओ दाखवला जात होता. यात त्यांचे तरुणीसोबतचे अश्लील चाळे दिसत होते. यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकात खळबळ उडाल्याचं दिसत आहे.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

Related Posts