IMPIMP

विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले – ‘राज्यात Weekend ऐवजी 3 आठवड्यांचा कडक Lockdown करावाच लागेल’

by pranjalishirish
lockdown three weeks strict lockdown state clear indication vijay vadettiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ‘ब्रेक दि चेन’ च्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांचा कडक बंद ठेवला आहे. मात्र, सद्यस्थितीत हा विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल असे मत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar  यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मी आजच 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

वडेट्टीवार Vijay Vadettiwar म्हणाले की, राज्यात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय राज्यातील निरपराध लोकांचे प्राण आपण वाचवू शकत नाही. कारण, राज्यात कोरोना स्प्रेड झालेला आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेवरही निर्बंध आणावे लागणार आहेत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही कितीही उपाययोजना केल्या, तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील हे आणणार कुठून. त्यामुळेच विकेंडऐवजी कडक लॉकडाऊनची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्यांचा रोजगार बुडत असल्याचे लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी खुली केली होती. मात्र मुंबई आणि परिसरात ज्या वेगाने कोरोना वाढत आहे. ते पाहता लोकलमधील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यातूनच लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वीप्रमाणे कठोर निर्बंध घालावेत यावर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts