IMPIMP

Chandrapur News | दारु विक्रेत्याने चक्क ‘या’ ‘मंत्र्या’च्या फोटोची केली पूजा; माझ्यासाठी ते देवच असल्याचे सांगत केली पूजा

by bali123
Maharashtra: Owner of a bar & restaurant in Chandrapur, performs 'aarti' of a photo of district's Guardian Minister Vijay Wadettiwar, as the six-yr-old liquor ban here was lifted by state govt last week

चंद्रपूर न्यूज (Chandrapur News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Chandrapur News | विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एका दारुविक्री (Illegal Liquor Sales) करणार्‍या रेस्टॉरंट आणि बार मालका ( bar & restaurant Owner) ने मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांच्या फोटोची पुजा करुन आरती केली आहे. माझ्यासाठी ते देवच आहे. असे त्याने सांगितले. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी ६ वर्षानंतर अखेर उठविण्यात आली आहे. ८ जून रोजी त्याबाबत शासनाने आदेश काढून त्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यामुळे कोरोनाचे कडक निर्बंध हटविल्यानंतर लवकरच जिल्ह्यातील बंद झालेली दारुची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर एका दारु विक्री करणार्‍याने विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करुन आरती केली आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच, आमचा दारुविक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला आहे. जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो, असे म्हणत एका दारु विक्रेत्याने दारुबंदी उठविल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जानेवारी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. ”
वर्धा, गडचिरोलीनंतर चंद्रपूरात दारुबंदी करण्यात आली होती.
या दारुबंदीच्या काळात अवैध दारुविक्रीचे मोठे रॅकेट तयार झाले होते.
त्यातून गावागावामध्ये दारुविक्रीची यंत्रणा तयार झाली होती.
मोठ्या प्रमाणावर बनावट दारु तयार करण्याचे रॅकेटही तयार झाले होते.
त्याचबरोबर उत्पादन शुल्कातून मिळणारे ३०० कोटी रुपयांच्या महसूलावर सरकारला पाणी सोडावे लागत होते.

Web Title : Maharashtra : Owner of a bar & restaurant in Chandrapur, performs ‘aarti’ of a photo of district’s Guardian Minister Vijay Wadettiwar, as the six-yr-old liquor ban here was lifted by state govt last week

Related Posts