IMPIMP

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

by pranjalishirish
mansukh-hiren-case-sachin-waze-will-be-transferred-crime-branch-home-minister-anil-deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गेल्या चार-पाच दिवसांपासून अडचणीत आलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल वाझे यांना तात्काळ निलंबीत करून नंतर बडतर्फ करा अन् अटक करा अशी मागणी केली होती. त्यावर आज गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून दुसरीकडे बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

मनसुख यांच्या पत्नीनं वाझे यांच्यावर खुनाचा आरोप केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाझे यांच्यावर आणि शिवसेनेवर घणाघाती आरोप केले होते. वाझेंना सरकार पाठीशी घालत असल्याचं देखील ते म्हणाले. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी प्रकरणाची चौकशी चालू आहे. आपल्याकडे काही पुरावे अथवा कागदपत्रे असतील तर ते माझ्याकडे किंवा राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे द्यावे असे सांगितले होते. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरूच ठवेला होता. वाझेंना सरकार पाठीशी का घालतंय हे कळण्यास मार्ग नसल्याचे सांगत फडणवीसांनी प्रसारमाध्यमांच्या समोर पुन्हा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्या पार्श्वभुमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी सचिन वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून दुसरीकडे बदली करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या प्रकरणी ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा आहे.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Related Posts