IMPIMP

MLA Gopichand Padalkar | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; आटपाडी डेपोला लावलं कुलुप

by nagesh
 Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar says the disputed land in miraj

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन –  MLA Gopichand Padalkar | एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून कर्मचारी अनेक ठिकाणी संप, आंदोलने करीत आहेत. यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत एक प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर आता भाजप नेते (BJP) आणि आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पडळकर यांनी सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी एसटी डेपोला (Atpadi ST Depot) टाळे ठोकले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असं आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे
अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप देखील आमदार पडळकर यांनी केला आहे.
मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत.
असा एक शाब्दिक टोलाही पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) लगावला होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुढे पडळकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.
परंतु, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे.
तसेच, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनं काल आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.
आतापर्यंत राज्यात 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
मात्र, आत्तापर्यंत राज्य सरकारचा एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही.
त्यांना कोणतीही मदत केली नाही, असं ते म्हणाले.

 

Web Title : MLA Gopichand Padalkar | gopichand padalkar angry over thackray government over msrtc st workers issue close st depot of aatpadi sangli

 

हे देखील वाचा :

Pune News | निराधारांसाठीच्या योजनांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळेल ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन; माजी आमदार मोहन जोशी यांनी केला पाठपुरावा

Life Certificate | तुमची पेन्शन SBI मध्ये येते का? घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा जीवन प्रमाणपत्र, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! 5 हजार गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 16.25 लाख रुपये

 

Related Posts