IMPIMP

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं’

by pranjalishirish
mns chief raj thackeray said the important issue is who place the vehicle with explosives near mukesh ambanis resident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागले होते. राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी ठेवली कुणी हा खरा महत्त्वाचा विषय आहे, असे परखड मत व्यक्त केले.

मुळ मुद्दा भटकटू देऊ नका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना परिस्थिती व परमबीर सिंह यांचं पत्र व अनिल देशमुख यांचा राजीनामा यावर भाष्य केले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही. माझी विनंती आहे की मुळ मुद्दा भटकटू देऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

विषयाला फाटा नको

आपण तिसरीकडे जातोय. प्रत्येक वेळी हेच होते. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पहातच नाही. सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांतसिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी… कशाचा कशाशी संबंध ? असे राज ठाकरे यांनी म्हटले.

देशमुखांवरील आरोप लांच्छनास्पद

परमबीर सिंह यांना 100 कोटींच्या टार्गेटची आठवण पोलीस कमिशन पदावरुन हटवलं गेल्यावरच का झाली ? आधी का झाली नाही ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटींच टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे, असेही राज ठाकरे Raj Thackeray  म्हणाले.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

विनोदातून मुख्यमंत्र्यांना चिमटा

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी एका विनोदातून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. राज ठाकरे म्हणाले, मला काल एक विनोद आला होता, सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे ? असा मजेशीर टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्य सरकारने लक्ष घालावे

मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला याचं नावं आलं आहे. याच पदाधिकाऱ्याचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

शरद पवारांची भेट घेणार

राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजेरोसपणे खून पडायला लागले तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही. या संबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे  Raj Thackeray यांनी दिली.

आमची पद्धत वेगळी, पण ती वेळ नाही

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बेड्स असून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या सवलती मिळूनही हॉस्पिटल अशाप्रकारे प्रकार करत आहेत. सामान्य नागरिकांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. हॉस्पिटलला सरकारने जाणीव करुन द्यावी. आमची जाणीव करुन द्यायची पद्धत वेगळी आहे. पण सध्या ती वेळ नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts