IMPIMP

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

by pranjalishirish
mns raj thackeray press conference maharashtra cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी रुग्णवाढीचे कारण सांगितले आहे. ‘महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार आहेत’, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

राज ठाकरे  Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा त्यांनी केला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. पश्चिम बंगाल वगैरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. तसेच त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत’.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

तसेच परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसे मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येते, कोण जाते याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज कोरोना आहे, उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही, असेही ते म्हणाले.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुख्यमंत्री म्हणाले मी क्वारंटाईन…

लॉकडाऊनसंदर्भात भेटण्याची विनंती करण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल फोन केला होता. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह आहेत. तेदेखील क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असे सांगितले. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झाले आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आले नसते, असे राज ठाकरे Raj Thackeray  यांनी सांगितले.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

Related Posts