IMPIMP

MP Amol Kolhe | ‘पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’ – खा. अमोल कोल्हे

by nagesh
MP Amol Kolhe | ncp mp amol kolhe idea to ncp karyakarta to make sharad pawar prime minister and ajit pawar chief minister

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MP Amol Kolhe | राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे आज (शनिवारी) पुण्यातील (Pune) भोसरी (Bhosari) येथे आले होते. भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना पिंपरी-चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. यावरुन खा. अमोल कोल्हेंनी (MP Amol Kolhe) प्रतिक्रिया देत अपेक्षा देखील व्यक्त केल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

खा. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान तर अजित पवारांना (Ajit Pawar)
मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे.
पुणे (Pune), पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही.
असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, असं खा. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले.
आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.

भोसरीमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अमोल कोल्हेंनी तेथील स्थानिकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर इथल्या नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता इथे ताकत वाढवली पाहिजे.
असं देखील अमोल कोल्हेंनी (MP Amol Kolhe) म्हटलं आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होती.
पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली.
मात्र, पालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली.
यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या हातून पालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, शरद पवार हे 13 ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

Web Title : MP Amol Kolhe | ncp mp amol kolhe idea to ncp karyakarta to make sharad pawar prime minister and ajit pawar chief minister

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | …म्हणून माझ्या मागे ED चा ससेमिरा – एकनाथ खडसे

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’

SIP | ‘या’ पध्दतीनं करा गुंतवणूक, तयार होईल 10.19 कोटींचा ‘फंड’; जाणून घ्या कसे करावे नियोजन?

 

Related Posts