IMPIMP

Eknath Khadse | …म्हणून माझ्या मागे ED चा ससेमिरा – एकनाथ खडसे

by nagesh
ED Notice To Eknath Khadse | NCP leader eknath khadse ordered to take down confiscated property by ed

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Khadse | जळगाव जिल्ह्यातील बोदवड (Bodwad) येथे येथे आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सभा झाली. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) बोलत होते. त्यावेळी त्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा बाहेर काढल्यानेच माझ्यामागे ईडीचा (ED) ससेमिरा लावण्यात आला असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सभेदरम्यान बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ईडीच्या चौकशीवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे बापजादे श्रीमंत होते, पण यांचे वडील शिक्षक होते, मग यांच्याकडं 1200 कोटींची संपत्ती कशी आली? असा प्रश्न करत जिल्ह्यातील एका बड्या नेत्याला लक्ष्य केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले, ‘बीएचआर पतसंस्थेचा (bhaichand hirachand raisoni jalgaon) विषय लावून धरल्याने आपल्यामागे ED ची चौकशी लावण्यात आली. या घोटाळ्यातच खरे दुखणे आहे. बीएचआर प्रकरणात हजारो ठेवीदारांचा घामाचा व रक्ताचा पैसा आहे. अनेक ठेवीदारांचे घरे उद्ध्वस्त झालीत. त्यांचे पैसे बुडू देणार नाही, याबाबत आपण ठेवीदारांना आश्वासन दिलेय. यांच्या प्रॉपर्टी विकायला लावेल मात्र ठेवीदारांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले की, यामध्ये काहींच्या जवळच्या लोकांना अटक झालीय. आणखी काही जण पुढील काळात जेलमध्ये जातील, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तर, ‘माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांच्याकडे मोठी शेतजमीन आणि वाडे होते. त्याचे तेव्हापासूनचे उतारेही आहेत. आपण काही भीक मागणारे किंवा कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. तरीही आपल्या प्रॉपर्टीची 10 वेळा चौकशी केली. पण, त्याचे वडील तर साधे शिक्षक होते मग त्याने हजार ते बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी कशी जमवली? त्याची चौकशी का होत नाही? असा अप्रत्यक्ष सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आणि त्यांचा फार्म हाऊसवर जप्त केला गेला,
अशी चर्चा 2 दिवसांपूर्वी सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
पण, एकनाथ खडसे यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून 2 दिवस खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर, बाहेर गावाहून परतल्यानतंर आज (शनिवारी) एकनाथ खडसे यांनी बोदवड येथील सभेत आपली भूमिका मांडली आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | jalgaon ncp leader eknath khadse on ed inquiry against him said

 

हे देखील वाचा :

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’

SIP | ‘या’ पध्दतीनं करा गुंतवणूक, तयार होईल 10.19 कोटींचा ‘फंड’; जाणून घ्या कसे करावे नियोजन?

Sanjay Raut | अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

 

Related Posts