IMPIMP

MP Girish Bapat | शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार का? भाजप खा. गिरीश बापटांचे सूचक विधान, म्हणाले…

by bali123
Pune BJP MP Girish Bapat passes away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात एकीकडे काँग्रेसकडून (Congress) स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच (Shiv Sena) भाजपासोबत (BJP) पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी भाजपसोबत युती करावी अशी थेट मागणीच पत्रातून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सेना- भाजप युतीची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावरून भविष्यात युती होऊ शकते, त्याचा आम्हाला आनंद होईल, असे सूचक विधान भाजपचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी केले आहे. mp girish bapat | will there be an alliance with shiv sena again bjp mp girish bapats suggestive statement

आमदार सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी जे पत्र लिहिले आहे. त्यातून शिवसैनिकांची खदखद बाहेर आली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्या भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सरनाईकांनी बोलकी प्रतिक्रिया दिल्याचे खासदार बापट (MP Girish Bapat) यांनी म्हटले आहे.

खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आमदार प्रताप सरनाईकांच्या (MLA Pratap Saranaik) पत्रावर आपली भूमिका मांडली आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) गेल्या 25 वर्षांपासून एकत्र होते. नंतर अनैसर्गिक लोकांमुळे आमची तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते.जर युती झाली तर आम्हाला त्याचा आनंद होईल.
प्रताप सरनाईक आता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होताना बोलत होते.
त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील.
आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय असल्याचे खासदार बापट यांनी म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

पुणे पालिकेच्या निवडणुकीत आमचे प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा (NCP) शिवसेनेला राहिल.
राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रातला एक छोटासा पक्ष (NCP is a small party in western Maharashtra) आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही.
अजितदादा (Ajit Pawar) हे शरद पवारांचे (Sharad Pawar) ऐकत नाही हे माहिती होत.
पण कार्यकर्ते ऐकत नाही हे माहिती झालं.
त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक असल्याचा टोलाही बापट यांनी लगावला आहे.
तसेच कोणत्याही व्यक्तीवर अथवा पक्षावर कुठलीही कारवाई भाजप करत नाही.
तपास यंत्रणा त्या कारवाई करत असतात.
मुळात भाजप गरीब पार्टी आहे, ती कारवाई नाहीतर लोकांना मदत करणारी पार्टी असल्याचे बापट म्हणाले.

Web Tital : – mp girish bapat | will there be an alliance with shiv sena again bjp mp girish bapats suggestive statement

Related Posts