IMPIMP

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

by omkar
Karnala Bank Scam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Karnala Bank Scam | रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित कर्नाळा बॅंकेच्या शेकडो कोटीच्या घोटाळा  (Karnala Bank Scam) प्रकरणात  ईडीने (ED)  बॅंकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील (Ex MLA Vivek Patil) यांना मंगळवारी (दि.15)  अटक केली आहे.
पाटील यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

(Ex MLA Vivek Patil arrested in Karnala Bank Scam by ED)कर्नाळा नागरी सहकारी बँकेत (Karnala Cooperative Bank) कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे तपासातून समोर आले होते.
हा गैरव्यवहार बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनीच केल्याचा आरोप झाला होता.
सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) कर्नाळा बॅंकेचे ऑडिट केले असता करोडो रूपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले आहे.

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

बेनामी खातेधारकांच्या नावाने खाते उघडून त्यात करोडो रुपयांची कर्जरूपी रक्कम देवून ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये पाटील यांनी वळती केल्याचा आरोप करण्यात आला होता.
बँकेत झालेल्या या गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या,
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,
आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता.
गेल्या वर्षी एक पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी  आरबीआयच्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी आता ईडीने ED चौकशी केल्यानंतर माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली आहे.

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

Related Posts