IMPIMP

Mumbai High Court | शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला हायकोर्टाकडून ‘दिलासा’

by nagesh
Mumbai High Court | bombay hc grants bail to woman who alleged harassment by shiv sena mp sanjay raut

मुंबई न्यूज (Mumbai News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Mumbai High Court | बनावट Ph.D. पदवी प्रकरणामध्ये मागील दीड महिन्यापासून अटकेमध्ये असलेल्या तसेच, शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) जामीन (Bail) मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्यावरील छळवणुकीच्या आरोपानंतरच आपल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आणि अटक करण्यात आल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जिल्हा सत्र न्यायालयाने त्या महिलेचा जामीन फेटाळल्यानंतर या महिलेने जामिनाच्या मागणीसाठी मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली होती. अ‍ॅड. आभा सिंह (Adv. Abha Singh) यांच्यामार्फत या महिलेने मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. यावरून न्यायमूर्ती एस. एस. शिंदे (Justice S. S. Shinde)आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार (Justice N. J. Jemadar) यांच्या खंडपीठाने मंगळवारी (27 जुलै) रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान या महिलेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

 

या दरम्यान, याचिकाकर्तीला अटक करून बराच काळ लोटला आहे.
म्हणून तिच्या चौकशीसाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला आहे.
असे न्यायालयाने तिला जामीन मंजूर करताना नमूद केलं.
तसेच, याचिकेवर निकाल दिला जाईपर्यंत याचिकाकर्तीने मानसोपचारतज्ज्ञ वा समुपदेशक म्हणून काम करू नये, पारपत्र पोलिसांकडे जमा करावे.
तपासात सहकार्य करण्यासह इतर अटी देखील कोर्टानं (High Court) घातलं आहे.

 

 

Web Title : Mumbai High Court | bombay hc grants bail to woman who alleged harassment by shiv sena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’

Pune Rural Police | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस; 3 आरोपींकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस

Gold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR

 

Related Posts