IMPIMP

Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या

by nagesh
Narayan Rane | BJP leader narayan rane got bail on this condition

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड न्यायालयाने (Mahad Court) मंगळवारी रात्री उशिरा सशर्त जामीन दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर हा जामीन देण्यात आला असून त्यासाठी त्यांच्यावर काही महत्वाच्या अटी घातल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

महाड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी जामीन देताना नारायण राणे यांनी कोणत्याही प्रकारे साक्षीदारांवर दबाव, दडपण आणू नये. नारायण राणे यांनी तक्रारदारावर दहशत, दबाव आणू नये. तसेच कागदपत्रे व पुराव्यांमध्ये छेडछाड करु नये.  महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahad MIDC Police Station) या महिन्याच्या दिवशी व पुढील महिन्यात एक अशी दोन दिवस हजेरी लावावी. तसेच तपास अधिकारी ज्या ज्या वेळी तपासासाठी बोलावतील, त्यावेळी उपस्थित रहावे. त्यासाठी तपास अधिकार्‍यांनी 7 दिवस अगोदर नोटीस द्यावी, असे निकालात म्हटले आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

राणे यांची जनआशिर्वाद यात्रा अडचणीत

जनआशिर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याने आता ही जनआशिर्वाद यात्रा अडचणीत आली आहे. जामीन मिळाल्यानंतर नारायण
राणे हे कुटुंबासह पहाटे मुंबईला पोहचले आहेत. तेथे ते आज दिवसभर विश्रांती घेणार आहे. त्यामुळे जनआशिर्वाद यात्रा २ दिवस पुढे ढकलण्यात आली
आहे.

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 7 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही
प्रकारच्या सभा समारंभांना परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे जनआशिर्वाद यात्रेला पोलिसांची परवानगी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे
नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातच जनआशिर्वाद यात्रा होण्याची शक्यता कमी आहे.

 

Web Title : Narayan Rane | BJP leader narayan rane got bail on this condition

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची अखेर बदली

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

Pune Crime | 10 % दराने व्याज वसूल करुन 2.5 लाखाची खंडणी उकळणार्‍या सावकारास आणि त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Gold Price Today | सोन्याचा भाव वाढला, चांदी सुद्धा महागली; जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts