IMPIMP

Jayant Patil : ‘देवेंद्र फडणवीस शब्दाला जागणारे, त्यांच्या शब्दावर माझा विश्वास’

by pranjalishirish
ncp leader jayant patil says my faith devendra fadnavis and their words

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके (Bharat Bhalke) निधनामुळं पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना तर भाजपकडून समाधान अवताडे (Samadhan Awatade) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आता या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस शब्दाला जागणारे नेते आहेत. त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे असं पाटील म्हणाले आहेत. पंढरपुरातील एका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

‘देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत, आताच त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य ठरणार नाही’

जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी भालके यांना शब्द दिलाय की, उमेदवार देणार नाही असं मला कोणीतरी सांगितलं आहे. 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही. चिंता करू नका. फडणवीस दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत. आताच त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य ठरणार नाही टोला पाटील यांनी लगावला आहे.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

‘सगळे घटकपक्ष एकत्र आले की, भाजपचा पराभव निश्चित होतो’

पुढं बोलताना जयंत पाटील म्हणाले, सगळे घटकपक्ष एकत्र आले की, भाजपचा पराभव निश्चित होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा सर्व घटकांचा भगीरथ भालके यांना आशीर्वाद आहे. काळजी करू नका. म्हणूनच कदाचित फडणवीस यांनी भालके यांना तसं सांगितलं असावं असंही पाटील म्हणाले.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

‘अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे’

जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय बाहेर पडू नका असं आम्ही त्यांना आग्रहानं सांगितलं आहे. इकडे नाही आलात तरी चालेल. तुमचे निष्ठावंत सैनिक ताकदीनं काम करतील. अजित पवारांपासून सर्वजण या मतदारसंघात येतील. शिवसेना आणि काँग्रेसचाही पाठींबा आहे. सर्वजण मिळून भाजपचा पराभव कण्याचे काम आपण करू. अजूनही देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी भगीरथ यांना तसं सांगितलं असेल तर ते अर्ज मागे घ्यायला लावतील असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध ? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

‘… तेव्हा तेव्हा सरकार उलथवून टाकल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत’

शेतकरी आंदोलनावरून बोलताना जयंत पाटील म्हणाले, भारतात जेव्हा जेव्हा सरकार शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी वर्गाच्या विरोधात जाते तेव्हा तेव्हा सरकार उलथवून टाकल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts