IMPIMP

अमृता फडणवीसांच्या गाण्यावर रोहित पवारांनी केली कमेंट, म्हणाले…

by pranjalishirish
ncp-leader-rohit-pawar-comments-amruta-fadnavis-new-song-kuni-mhanale

सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना संगीत आणि गाण्याची किती आवड आहे, सर्वांना माहितीच आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची काही नवीन गाणी सर्वांच्या भेटीला आली होती. भाऊबीजेच्या निमित्तानं एक आणि व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं एक गाणं त्यांनी रिलीज केलं होतं. काहींनी त्यांचं कौतुक केलं होतं, तर काहींनी मात्र त्यांच्या गाण्यावर टीकाही केली होती. आता नुकतंच महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी असं या गाण्याचं आहे. 8 मार्च रोजी महिलादिनी हे गाणं रिलीज झालं. सर्वांची यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही अमृता यांच्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार Rohit Pawar यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणाले, काही लोकांना सहज तर काही लोकांना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. परंतु अमृताताई आपण मिळालेल्या संधीचा गाण्याची आवड जेपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी अमृता यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

रोहित पवार Rohit Pawar यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरदेखील केलं आहे.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts