IMPIMP

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

by pranjalishirish
ncp mla rohit pawar facebook post criticizes devendra fadanvis and other bjp leaders

बारामती : सचिन वाझे प्रकरण, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे ‘लेटरबॉम्ब’ प्रकरण या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या सर्व टीकांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  Rohit Pawar यांनी भाष्य करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘विरोधी पक्षनेत्यांमध्ये ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होत आहे,’ असा टोला लगावला.

‘त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपला प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता रोहित पवार Rohit Pawar  यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी संसदेमध्ये झाली, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या सर्व गोष्टी पाहता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झाला आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिले’.

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

तसेच ते पुढे म्हणाले, ‘गृहमंत्री महोदयांनी रुग्णालयाबाहेर दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असेही ते म्हणाले.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुनगंटीवार यांच्यावरही साधला निशाणा

‘गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो पाहावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा’, असे टीकास्त्रही सोडले.

Also Read :

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

Related Posts