IMPIMP

‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’

by pranjalishirish
ncp mla rohit pawar slams former chief minister devendra fadnavis over meeting delhi home ministry

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. मी माझ्या जवळील सर्व पुरावे एका बंद लिफाफ्यात केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. या प्रकरणांसदर्भात माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी त्यांना सांगितली आहे. सोबतच त्याची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागाणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यावरूनच रोहित पवार Rohit Pawar यांनी आता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

‘राज्याच्या हिताचा विषय येतो तेव्हा राज्याची बाजू घेणं हेही विरोधी पक्षनेत्याचं कर्तव्य आहे’

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते दिल्लीला जाऊन आले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी निश्चित काम करावं. परंतु राज्याच्या हिताचा विषय येतो तेव्हा राज्याची बाजू घेणं हेही विरोधी पक्षनेत्याचं कर्तव्य आहे. हेही त्यांनी विसरायला नको. माझ्या माहितीनुसार अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याच्या हिताचे किमान 31 विषय केंद्राकडे प्रलंबित असून हे विषय मार्गी लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Devendra Fadnavis : ‘लवंगी होता तर ते एवढे घाबरले का?’

‘दिल्लीत एवढं वजन असल्यावर राज्याचे प्रलंबित प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी निश्चितच केंद्र सरकारकडे मांडले असतील’

पुढं बोलताना रोहित पवार Rohit Pawar  म्हणाले, राज्यातील निवडक खासदार या प्रश्नांसाठी प्रयत्न करत असतात. परंतु बहुतांश खासदार कशासाठी लोकसभेत आवाज उठवतात हे विरोधी पक्ष नेत्यांनीही गेल्या दोन तीन दिवसात अनुभवलं असेलच. राज्य सरकार तर केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करतच असतं. विरोधी पक्ष दिल्लीत जाताच केंद्रीय कायदा मंत्र्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत आगापाखड केली. सुशांत सिंह प्रकरणात ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकारवर दिवसरात्र टीका आरोप करत आपल्या राज्याला बदनाम करण्याचा हिंदी माध्यमांनी प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे कालही हिंदी माध्यमातून राज्यावर आरोप करणं सुरू होतं. संविधानाला बगल देऊन दिल्ली सुधारणा कायद्याचं विधेयक पारित होऊन दिल्ली सरकारचे हक्क सीमित करण्याचा विषय असो किंवा मग बिहार विधानसभेत आमदारांना झालेली मारहाण हे महत्त्वपूर्ण विषय हिंदी माध्यमांसमोर दुर्लक्षित विषय आहेत. या सर्व बाबी बघता राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं दिल्लीत चांगलं वजन असल्याचं दिसतं. दिल्लीला गेले म्हटल्यावर आणि दिल्लीत एवढं वजन असल्यावर राज्याचे प्रलंबित प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी निश्चितच केंद्र सरकारकडे मांडले असतील अशी आशा करूयात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

100 कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख यांची भेट, पुढं काय होणार?

‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं’

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, निराधार आरोपातील हवा निघून गेल्यानंतर नवीन काहीतरी आरोप करायचे हा राज्यातील विरोधी पक्षाचा नेहमीचा खेळ आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला अशी काही हवा दिली की, यातून खूप मोठं खळबळजनक काहीतरी बाहेर येईल असं लोकांना वाटत होतं. याच मुद्द्यावर भाजपनं बिहारची विधानसभा निवडणुकही लढवली, परंतु सत्य हे कधी झाकत नसतं. तसाच एक प्रयत्न त्यांनी आताही सुरू केला आहे. सत्तेच्या बाहेर असणं त्यांना बिलकुलच सहन होत नाही असं एकंदरीत दिसत आहे. परंतु पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता त्यांचं कौतुकही करावंसं वाटतं. आपले राजकीय मनसुबे पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षनेते दिल्लीला जाऊन आले तरी त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे सत्य आहे. परंत दिल्ली भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील प्रलंबित विषय मांडले असतील तर त्यांचा दिल्ली दौरा तरी सार्थकी लागेल असं म्हणायला हरकत नाही असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी बोलताना लगावला.

Aslo Read : 

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts