IMPIMP

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

by pranjalishirish
ncp mp supriya sule discusses with congress president sonia gandhi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  सचिन वाझे प्रकरण तसेच परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.  विरोधकांच्या एकएक आरोपांमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule  यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्यात राज्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधींनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

WhatsApp युजर्स, सावधान ! ‘हा’ मेसेज तुमच्यासाठी ठरू शकतो अडचणीचा

महाविकास आघाडी सरकारवर होत असलल्या आरोपांमुळे काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी पाटील यांनी राज्यातील परिस्थितीबद्दल एक आढावा मागवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि खासदार सुळे Supriya Sule  यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.  दरम्यान राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. राऊतांच्या दिल्लीतील निवास्थानी मैथिली ठाकूर हिच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या डिनर डिप्लोमसीला भाजपचे नेते रावसाहेब दानवे,  गिरीश बापटांनी हजेरी लावली होती. तसेच राष्ट्रवादी, एमआयएम, काँग्रेसचे खासदार एकत्र आले होते.

Also Read : 

Video : लिलावती रुग्णालयात पोहोचला ‘भाईजान’ सलमान ! जाणून घ्या नेमकं कारण काय

Ind vs Eng : दुसर्‍या वनडेच्या पूर्वी टीम इंडियाला झटका, सीरीजमधून बाहेर गेला ‘हा’ स्टार फलंदाज

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

Related Posts