IMPIMP

नितेश राणेंचा सरदेसाईंना टोला, म्हणाले – ‘शादी डॉट कॉम… या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा’

by pranjalishirish
nitesh rane slams varun sardesai in sachin vaze arrest case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राणे Nitesh Rane आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा पेटू लागला आहे. मागील काही दिवसांत भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सचिन वाझे यांना अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी वाझे आणि वरूण सरदेसाई यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर म्हणून सरदेसाई यांनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत जोरदार टीका केली आहे. तसेच आपण एका सुसंस्कृत घरातून असल्याचेही वरून सरदेसाई म्हणाले.

यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्विट करत लग्नासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा टोला लगावला आहे.नितेश राणे यांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांचे संबंध होते. दोघांच्या मोबाईलवरील संभाषणाची एनआयएकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याला उत्तर देताना युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्वतःची शैक्षणिक व कौटुबिक पार्श्वभूमी सांगितली त्यावरून नितेश राणे यांनी हा टोला लगावला आहे.

काय म्हणाले नितेश राणे
“डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच त्याने आपली व कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा,” असे ट्विट करत नितेश राणे Nitesh Rane यांनी टोला लगावला आहे. या अगोदर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरूण सरदेसाई यांच्यावर टीका केली होती. नितेश राणे पुढे म्हटले, लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? तसेच “सचिन वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढलं नाही. मी बोललो ते खरं की खोटं, याबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का?,” असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

“आम्हाला शिवसेनेची अंडीपिल्ली माहितीये”
वरुण सरदेसाई यांनी नितेश राणे यांच्या आरोपावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा निलेश राणे यांनी त्याला उत्तर देताना आपणही शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू, असे म्हंटले आहे. “आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढायची का? ही माहिती बाहेर आली, तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts