IMPIMP

सचिन वाझे यांची फक्त बदली नको, तर अटक करा; प्रवीण दरेकरांची मागणी

by amol
not happy mere tranfer arrest sachin vaze says pravin darekar

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे Sachin Waze यांचे नाव आल्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या बदलीवरही विरोधकांनी हल्लाबोल केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे Sachin Waze यांची बदली झाली, यावर आम्ही समाधानी नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचे निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin Waze हे संशयाच्या भोवऱ्यात होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यावर विरोधक समाधानी नाहीत. त्यांनी म्हटले, की सचिन वाझेंचे निलंबन होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मानसिकता सरकारची नाही. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, सचिन वाझेंवर कारवाईसाठी विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
त्यानुसार, विरोधकांनी काल विधानसभेत गोंधळ घातला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी केली.
त्यानंतर आता सरकारने सचिन वाझे यांच्यावर कारवाई केली आहे.
त्यांच्यावरील कारवाईवर प्रवीण दरेकर यांनी निलंबित करून अटक करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts