IMPIMP

OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करावा ! ओबीसी समाजाचा विश्वासघात करणार्‍या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  –  OBC Reservation | ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) घालविणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी (BJP) तर्फे उद्या (15 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पुणे शहर OBC आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे (Pune OBC lead president Yogesh Pingale) यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही योगेश पिंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

योगेश पिंगळे यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) टोलवाटोलवी करत आहे.
ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे.
मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.
इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
याप्रसंगी भाजप ओबीसी आघाडीचे प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, शंतनु नरके हे यावेळी उपस्थित होते.

 

ओबीसींसाठी आरक्षित जागांवर मूळ ओबीसी समाजाच्याच उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी, ही आमची मागणी आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे या पक्षाकडून ओबीसीचे बनावट दाखले काढून निवडणूक लढविलेेले आणि नंतर न्यायालयीन लढाईत नगरसेवक पद रद्द झालेल्यांची संख्या अधिक आहे.
परंतू भाजप एकमेव असा पक्ष आहे, जो ओबीसींसाठी आरक्षित जागेवर मूळ ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देतो, असा दावा गणेश कळमकर यांनी यावेळी केला.

 

Web Title : OBC Reservation | Why not give a lawyer in the Supreme Court? Reveal! Statewide agitation by BJP against the alliance government which betrayed the OBC community

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | आता मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘वुमन सेफ्टी सेल’!

Menstruation Myths | मासिक पाळीसंबंधी ‘या’ अफवांवर आजही विश्वास ठेवतात लोक, जाणून घ्या ‘सत्य’

Relationship | कलयुग ! विवाहित महिलेचं ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत ‘झेंगाट’, दिला 3 मुलांना जन्म; कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 194 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts