IMPIMP

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड

by nagesh
Ajit Pawar | students will get a loan of up to 30 lakhs for education ajit pawar pune district cooperative bank pdcc bank

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PDCC Bank Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (PDCC Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘अ’ वर्ग मतदारसंघातून बारामतीतून अर्ज दाखल केलेले शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांची बिनविरोध निवड झाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकाळात प्रथमच त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. खरं तर अजितदादांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच याच बँकेतून झाली होती. 1999 पासून अजित पवार या बँकेचं प्रतिनिधित्व करत आहेत. आतापर्यंत 7 वेळा अजित पवारांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. यंदाही त्यांनी बाजी मारली आहे. (PDCC Bank Election)

 

दरम्यान, संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) व
संजय जगताप (Sanjay Jagtap) यांची याआधीच बिनविरोधी निवड झाली आहे.
तर, अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. सतीश काकडे (Satish Kakade)
यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार की,
ते बिनविरोध होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
अखेर सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यांमुळे पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- PDCC Bank Election | ncp leader ajit pawar elected unopposed in pune district bank election pdcc bank news

 

हे देखील वाचा :

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Crime | पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना

 

Related Posts