IMPIMP

PMRDA Election | PMRDA च्या निवडणुकीत भाजपनं 14 जागांवर बाजी मारली; शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी तर काँग्रेसला धक्का

by nagesh
PMRDA Election | pmrda election bjp won 14 seats congress lost election

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  PMRDA Election | पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या (PMRDA Election) सदस्यपदासाठी बुधवारी (10 ऑक्टोबर) रोजी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा आज (शुक्रवारी) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने (BJP) 14 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला (Congress) धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांचा मात्र विजय झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पीएमआरडीएच्या (PMRDA Election) एकूण 30 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं होतं. यामध्ये महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काही कुजबूज झाल्याने काँग्रेसला एकटे लढावे लागले. तसेच या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तिसरी आघाडी झाली होती. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. मुख्य:ता म्हणजे आघाडीचा फायदा भाजपला झाल्याचं दिसत आहे.

पीएमआरडीएमध्ये (PMRDA Election) शिवसेनेकडे पुण्यात 10 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 19 मते होती. तसेच, भाजपकडे 172 मते होती. या निवडणुकीत भाजपने 14 उमेदवार दिले होते. त्यांचे हे सर्व उमेदवार विजयी झाले असून भाजपच्या बाजूने 100 टक्के निकाल आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडे 10 मते होती. त्यामुळे अतिरिक्त मतांचा कोटा भरून काढणे काँग्रेसला कठिण गेले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, पीएमआरडीएच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बंडखोरी करून उमेदवार दिला होता. पंरतु, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
30 पैकी भाजपने 14 जागा, राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला. तसेच शिवसेनेलाही या निवडणुकीमध्ये यश आलं आहे.
दरम्यान, विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या गेटसमोर जल्लोष करत विजयाचा आनंद लुटला आहे.

 

Web Title : PMRDA Election | pmrda election bjp won 14 seats congress lost election

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | 5 महिन्यानंतर सोन्याचा भाव 50 हजार पार, चांदीही वधारली; जाणून घ्या

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा झटका ! न्यायालयाने ईडी कोठडीत केली ‘एवढ्या’ दिवसांची वाढ

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवीन दर

 

Related Posts