IMPIMP

भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली, विमानानं मुंबईत उपचारासाठी दाखल

by bali123
mp pragya thakur

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर ( mp pragya thakur ) यांची प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना तातडीने मुंबईत हलविण्यात आलं आहे. खासदार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यानंतर त्यांना चार्टर्ड विमानाने मुंबईला नेण्यात आले. येथे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले जाईल. दरम्यान, साध्वी प्रज्ञा ठाकूर अनेक आजारांनी त्रस्त होत्या, त्यांना 19 फेब्रुवारीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

माहितीनुसार, साध्वी शनिवारी दुपारी तीन वाजता भोपाळ येथे जिल्हा पंचायत कार्यालय येथे आयोजित दिशा समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार होत्या. मात्र, शुक्रवारी सायंकाळी त्यांचा रक्तदाब अचानक वाढला आणि आज सकाळी श्वास घेण्याची समस्या सुरू झाली. त्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात आलं.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांचा पराभव करून साध्वी प्रज्ञा भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या.
त्यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप असून, त्यांच्या विरोधात मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे साध्वी नेहमीच चर्चेत असतात.

Related Posts