IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘मी मर्द आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाषणात कधीही म्हणू नये’

by sikandershaikh
pooja-chavan-suicide-case-bjp-nilesh-rane-target-chief-minister-uddhav-thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. भाजपचा या प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा आहे. अशात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी 15 दिवस गायब राहिल्यानंतर पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनावरून ठाकरे सरकारला घेरायला (Uddhav Thackeray Government) भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला पुन्हा एकदा आयती संधीच मिळाली. यावर आता भाजप सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) 48 तासांपूर्वी असं आवाहन करतात की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी आपापली खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आदेशाला झुगारून मंत्री संजय राठोड आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतात यावरून निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे ?

निलेश राणे यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राठोडांचा एकेरी उल्लेखही केला. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतंय. सगळ्या बाजूनं अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो.
कॅबिनेट मिटींगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.
पुन्हा कधीही मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोलाही राणेंनी लगावला आहे.

‘एका गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत’

निलेश राणे असंही म्हणाले, पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चित्रा वाघ (Chitra Wagh) या वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या.
पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटलं.
एका गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत हे यावरून लक्षात आलं अशी टीकाही त्यांनी केली आहे.

निलेश राणेंनी शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

Pooja Chavan Suicide Case : ‘CM ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार ?’

Related Posts