IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात’, चित्रा वाघ यांचा आरोप

by amol
Sanjay Rathod On Chitra Wagh | eknath shinde camp rebel sanjay rathod on bjp chitra wagh maharashtra cabinet expansion

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. भाजपचा या प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज पूजा चव्हाण राहात असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं. सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.

 

‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करताहेत’

चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग, राज्याचे पोलीस महासंचलाक यांना दिलेला चौकसी अहवाल हा वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हा अपूर्ण अहवाल सादर करून पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना टोपी घालण्याचं काम केलं आहे. सत्तेत असणारे तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा पायंडा महाराष्ट्रासाठी घातक आहे असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

‘संजय राठोड दोषी असून ते या आत्महत्येला जबाबदार’

पुढं बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड दोषी असून ते या आत्महत्येला जबाबदार आहेत. 16-17 दिवस मुंबईतून केस आम्ही मॉनिटर करत होतो.
घटना घडली तो फ्लॅट सील केला होता. तिनं उडी मारली की, तिला उडी मारायला लावली याबाबत स्पष्टता नाही.
वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड हे ज्या पद्धतीनं बोलत होते ते पाहता केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही. पूजा चव्हाण सोबत तिथं राहणाऱ्या 2 जणांचं काय.
त्यांची चौकशी करावी असं पोलिसांना वाटलं नाही.
ते दोघं फरार आहेत. पोलिसांनी या केसमध्ये काहीच करायचं नाही असं ठरवलं आहे.
मुंबई पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळतात आणि वानवडी पोलीस निरीक्षक सांगतात आम्हाला मुलीच्या पालकांची लेखी तक्रार आलेली नाही.

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा निर्णय !

Related Posts