IMPIMP

Prashant Jagtap | कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

by nagesh
Prashant Jagtap | agitation behalf ncp pune actress kangana ranaut statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Prashant Jagtap | ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत म्हटले होते की, 1947 साली भीक मिळाली होती, देशाला स्वातंत्र्य (freedom) तर 2014 ला मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP Pune) वतीने निषेध करत आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कंगना रणौतचं करायच काय, खाली डोकं वर पाय, भाजपची पोपट कंगना रणौतचं करायचं काय, कंगना माफी मागो, कंगनाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करत पुण्यात राष्ट्रवादीने कंगना विरुद्ध आज (शुक्रवार) बालगंधर्व चौकात (Balgandharva Chowk) आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh), नगरसेवक सचिन दोडके (Corporator Sachin Dodke), महिला शहराध्यक्ष मृणालीनी वाणी, युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते, युवती प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, कार्याध्यक्ष अॅड. श्रुती गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतच्या स्टेटमेंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर निषेध करत आहे. या स्टेटमेंटला अमित शहा (Amit Shah) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जबाबदार आहेत. त्यांना देशाच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास झाकायचा आहे. तसेच एक मनुवादी वृत्ती पुढे आणण्याची आहे. त्यासाठी कंगना रणौतला पुढे ठेवून अशी पेरणी केली जात असल्याचा आमचा आरोप आहे. कंगना वर देशद्रोहाचा गुन्हा (FIR) दाखल करावा अशी आमची मागणी असल्याचे जगताप यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आपल्या महान भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई,
तात्या टोपे यांच्यापासून शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांनी निकराचा लढा दिला.
मात्र केवळ हुकूमशहांच्या पायाशी निष्ठा वाहून कालपरवा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळवणाऱ्या
कंगना रनौत या अभिनेत्रीने ‘1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली’
असे संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या तमाम वीरांचा अवमान केला असल्याची भानवा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली.

 

Web Title :- Prashant Jagtap | agitation behalf ncp pune actress kangana ranaut statement

 

हे देखील वाचा :

तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही का? National Consumer Helpline वर ग्राहक करू शकतात तक्रार; जाणून घ्या प्रक्रिया

Maharashtra Rains | …म्हणून राज्यात वाढणार पावसाचा जोर, आगामी 5 दिवस हाय अलर्ट

PMRDA समिती सदस्य निवडणूक ! एकसंघ पद्धतीने भाजप निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता – सभागृह नेते गणेश बिडकर

 

Related Posts