IMPIMP

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

by nagesh
Punjab New CM | congress leader ambika soni reject offer to become punjab next chief minister

चंदीगड : वृत्तसंस्था – कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री (Punjab New CM) कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे आहे. मात्र, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अंबिका सोनी यांची निवड केली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी दिलेली मुख्यमंत्री पदाची ऑफर अंबिका सोनी यांनी नाकारली (Ambika Soni Reject CM Post Offer) आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रविवारी सकाळी सोनिया गांधी यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab New CM) म्हणून अंबिका सोनी यांचे नाव पुढे केले होते.

सुत्रांच्या माहितीनुसार, अंबिका सोनी यांनी स्वत:ला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या (Punjab New CM) शर्यतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चंदीगडमध्ये पंजाबचे नवे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर काँग्रेसचे आमदार सुखजिंदर सिंह रंधावा (MLA Sukhjinder Singh Randhawa) म्हणाले, येत्या दोन ते तीन तासात मुख्यमंत्रीपद कोणाला दिले जाणार याचा निर्णय घेतला जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाचे हेलिकॉप्टर अंबिका सोनी यांना घेण्यासाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे. परंतु अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याने या वृत्ताला पूर्णविराम मिळाला आहे. अंबिका सोनी यांनी प्रकृतीचे कारण देत मुख्यमंत्री बनण्याची ऑफर नाकारल्याचे सुत्रांकडून समजतेय.

सुनिल जाखड नवे मुख्यमंत्री ?
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे आघाडीवर होती. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांचे नाव निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसने सुनील जाखड यांचे नाव नवीन मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.

 

दोन उपमुख्यमंत्री

या शिवाय पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक उपमुख्यमंत्री दलित समाजातील असेल.
या शर्यतीत माजी कॅबिनेट मंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजकुमार वेरका (Prince Verka) यांची नावे आघाडीवर आहेत.
तर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून माजी कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांचे नाव पुढे आहे.

नवज्योत सिंग सिद्धूच्या नावाला विरोध
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यास अमरिंदर सिंह यांनी विरोध दर्शवला आहे.
ते म्हणाले, नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम नाही.
ते देशासाठी आपत्ती ठरतील. त्यांच नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर घेण्यास माझा नकार आहे.
त्यांचे पाकिस्तानसोबत संबंध आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी हे धोकादायक आहे,
अश शब्दात अमरिंदर सिंह यांनी आपला राग व्यक्त केला.

Web Titel :- Punjab New CM | congress leader ambika soni reject offer to become punjab next chief minister

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग चालकाला अटक

Fake Currency | नोटबंदी कुचकामी ! देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; प. बंगाल, युपी, गुजरात आघाडीवर तर महाराष्ट्रातही Fake नोटांचे प्रकार वाढले

USB Cable Private Part | ‘वाढीव’ काम करताना 15 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल, करावे लागले ‘ऑपरेशन’

Related Posts