IMPIMP

राज ठाकरे म्हणाले – ‘आपण भेटूयात’, क्वारंटाईन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

by pranjalishirish
raj thackeray said lets meet cm uddhav thackeray said i am a quarantine

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी फोन केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी क्वारंटाईन असल्याचे सांगितले.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

राज ठाकरे Raj Thackeray यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्यातील बैठकीची माहिती दिली. लॉकडाऊनसंदर्भात भेटण्याची विनंती करण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल फोन केला होता. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह आहेत. तेदेखील क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येईल, असे सांगितले.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

तसेच ते म्हणाले, ‘लॉकडाऊन काळात सरसकट वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्यावी. त्यासाठी राज्याने केंद्राशी बोलावे. अनेकांनी छोटी-मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केले जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?, असा सवालही त्यांनी बैठकीत केला.

दरम्यान, जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असे असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे? विकायचं नाही तर उत्पादन का करायचे? म्हणून मी सांगितले दोन-तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या, अशी मागणीही राज ठाकरे Raj Thackeray  यांनी केली.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

परप्रांतीयांमुळे रुग्णसंख्या वाढतीये

‘महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. पश्चिम बंगाल वगैरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. तसेच त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत’, असेही ते म्हणाले.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts