IMPIMP

मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने उच्चारल्या जाणाऱ्या ‘किंबहुना’ शब्दावर राज ठाकरेंचा खोचक ‘टोला’

by pranjalishirish
raj thackeray taunts uddhav thackeray over kimbahuna

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात पसरत असलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशभरातील एकूण संख्येपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यात 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती देताना मुख्यमंत्र्यांडून सातत्याने उच्चारल्या जाणाऱ्या ‘किंबहुना’ शब्दावर राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Raj Thackeray  यांनी विरोधी पक्षांशी या संदर्भात चर्चा करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत झूमच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीतील माहिती राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी काल फोन केला होता. लॉकडाऊनच्या संदर्भात मी त्यांना भेटण्याची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्यांच्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येईल, असे ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतेय. किंबहुना…. किंबहुना वापरलं तर चालेल ना ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितांना विचारला आणि एकच हशा पिकला.

कोरोना वाढण्याची दोन कारणं

राज्यात कोरोना वाढण्याची दोन कारणं असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. हे लोक दररोज राज्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोजले जात आहेत. तर इतर राज्यात रुग्ण मोजले जात नाहीत. तिथेही अशीच परिस्थिती असणार, पण रुग्ण मोजले तर समोर येईल, असे राज ठाकरे म्हणाले.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

ती गाडी कोणी आणि का ठेवली

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही. माझी विनंती आहे की मुळ मुद्दा भटकटू देऊ नका, असे राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले. सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का ? त्यांच्यावर राज्य आलं आहे हेच समजेना असा टोला सरकारला राज ठाकरे यांनी लगावला.

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं’

लसीकरणाला वयाचे बंधन नको

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून एकट्या राज्य सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. कोरोना हा देशाचा विषय आहे. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. लसीकरणही वाढले पाहिजे. त्याला वयाचे बंधन नको. त्यातील टेक्निकल बाबी मला माहित नाही. पण वयाचे बंधन नकोच. सर्वजण लॉकडाऊन पाळतील अशी आशा आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts