IMPIMP

‘खंडणीखोरांना समर्पण कळालंच नाही, श्री राम सेवा काय कळणार !’

by bali123
Ram Mandir

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राम मंदिर (Ram Mandir, Ayodhya) साठी देशभरातून देणगी जमा केली जात आहे. यासाठी अभियान राबवलं गेलं आहे. भाजपच्या या अभियानावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घणाघाती टीका केली आहे. भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरूय असा आरोप नाना पटोले यांनी केला. विधानसभेत ते बोलत होते. दरम्यान भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमकपणे याला प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काही काळ स्थगित करावं लागलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेससह महाविकास आघाडी सराकरमधील पक्षांवर जोरदार टीका केली.

भाजपनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. यात लिहिलंय की, श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणं हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटतं. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत त्यांना श्रीराम सेवा काय कळणार. खंडणीखोरांना समर्पण हे कधी कळलं नाही आणि कळणारही नाही. श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्मही. जय श्रीराम असं भाजपनं म्हटलं आहे.
याशिवाय खंडणी वसूल करणाऱ्यांना सेवा काय कळणार असं फडणवीसही म्हणाले आहेत.

राम मंदिरावरून नाना पटोलेंचे अनेक सवाल


नाना पटोले यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावर बोलताना अनेक सवाल उपस्थित केले.
राम मंदिराच्या नावानं टोलवसुली केली जात आहे. भाजपला हा अधिकार कुणी दिला.
ज्यानं राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातोय अशी एक तक्रार देखील माझ्याकडे आलीय असंही पटोले यांनी सांगितलं.
इतकंच नाही तर महाराष्ट्रात भगवान रामाच्या नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण ?
त्यांना ठेका दिलेला आहे का? केंद्र सरकारनं याचं उत्तर द्यायला हवं असे अनेक सवाल पटोले यांनी केले.

‘उद्या कोरोना झाला तर आमच्यावर पावती फाडाल’, अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना ‘टोला’

Related Posts