IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

by pranjalishirish
Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve criticized to uddhav thackeray on shivsena and bjp together

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन- अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve  यांनी राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर नियंत्रण राहिलेले नाही. प्रत्येक मंत्र्याला मोकळीक दिली आहे. आता दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, लवकरच राज्यातील मंत्र्यांची राजीनाम्यासाठी रांग लागेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

शिवसेनेवर निशाणा साधताना रावसाहेब दानवे Raosaheb Danve  म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र, भाजपसोबत दगाफटका करुन शिवसेनेने सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांच्या चक्रव्यूहात शिवसेना फसली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने नामुष्की पत्करावी लागत आहे. जनतेच्या हिताचे काम करायचे सोडून प्रत्येकजण आपापले पहात असल्याने सरकारमध्ये समन्वय राहिलेला नाही. राज्यातील सरकारचे भविष्य कोणालाही माहिती नाही. ते रोज दिवस मोजत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, कोरोना संदर्भात उपाय योजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत.याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असून रुग्ण वाढत असताना प्रशासन काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. वेळेवर व्यवस्था न केल्यामुळे राज्यातील जनतेवर ही वेळ आल्याचे दानवे Raosaheb Danve यांनी सांगितले.

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

जालन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. यावर बोलताना त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली. जालन्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत. मात्र, जालन्यातील प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. जालन्यात मृतांची संख्या वाढत आहे, असे दानवे म्हणाले.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

Related Posts