IMPIMP

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

by Team Deccan Express
NCP Nawab Malik | NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrived at the office of the Enforcement Directorate in Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना पहायला मिळत आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना कोरोना रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या रेमडेसिवीर remedesivir इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. देशात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुतरमधील भाजप कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच हे राजकारण नाही तर काय आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे.

Lockdown वरून उदयनराजे आक्रमक; म्हणाले – ‘पोलिसांना लोकं चोपून काढतील, मारामारी झाली तर…जस्ट रिमेंबर दॅट’

मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या गुजरातमधील ऑफिसमध्ये रेमडेसिवीर remedesivir मोफत वाटपाच्या मुद्यावरुन मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणाले,’कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्यातच केंद्र सरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरु असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे.’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

दरम्यान, या इंजेक्शनवरुन राज्यात मोठा गदारोळ उडला आहे. नागरिकांना इंजेक्शन मिळत नसल्याने याचा फायदा घेत इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाला आहे. इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी परिस्थिती सुधारलेली नाही. रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळवण्यासाठी धावाधाव करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे. अद्याप यावर भाजपने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts