IMPIMP

RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपच्या महिला कर्यकर्त्यांचे म्हणणं काय ? काँग्रेस नेत्याचा सवाल

by bali123
Nana Patole | chief minister should investigate allegations against ncp leader nawab malik and bjp leader devendra fadanvis leaders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावरून काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या (BJP) महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेली आरएसएस (RSS) लग्नाला कंत्राट (Marriage Contract) समजते, यावर त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

विधानसभा परिसरात प्रसारमाध्यमांशी नाना पटोले Nana Patole यांनी आज (सोमवार) संवाद साधला. महिला दिनाचे औचित्य साधून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू केले आहे. यावरून नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचे मत काय आहे. ते लग्नाला कंत्राट समजतात, यावर त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

…तर नाणार प्रकल्प विदर्भात
यावेळी नाना पटोले यांनी नाणार प्रकल्पावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नाणार प्रकल्प कोकणात होत असेल तर हरकत नाही. मात्र, हा प्रकल्प कोकणात होणार नसेल तर तो विदर्भात झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे पटोले यांनी सांगितले. आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, अर्थसंकल्पातून सर्वांनाच अपेक्षा असतात. चांगला अर्थसंकल्प मिळेल, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.

Related Posts