IMPIMP

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…

by bali123
Budget 2021-22 : Government's big 'gift' on World Women's Day; If you take a house in a woman's name ...

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याच महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने 2021-22 या वर्षासाठी अर्थसंकल्प ( Budget-2021 ) सादर करताना राज्यातील महिलांसाठी मोठं गिफ्ट दिले आहे. त्यानुसार आता महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्क माफ होणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच एक एप्रिलपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

2021-22 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत अजित पवार यांनी सादर केला. त्यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतुदींची घोषणा केल्या आहेत. यामध्ये 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी दिले जाणार आहे. सिंचन विभागासाठी 12 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पक्का गोठा बांधण्यासाठी सरकारकडून अर्थसाह्य केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार आहे. याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 421 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

तसेच पुण्याजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे. तसेच पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोस्टर रोडचे काम 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुंबईत सायकल मार्ग उभारण्यात येणार आहे. परिवहन विभागासाठी 2500 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय 2461 कोटींची तरतूद शालेय आणि क्रीडा विभागासाठी केली आहे. महत्त्वाच्या महामार्गावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पातील प्रमुख मद्दे –

  • – नगरविकास विभागासाठी 8400 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • – शाळकरी मुलींना मोफत एसटीचा प्रवास मिळणार आहे. त्यासाठी 1500 हायब्रिड बसेस असणार आहेत.
  • – महाराष्ट्रातील पहिल्या स्वतंत्र महिला राज्य राखीव दलाची घोषणा करण्यात आली आहे.
  • – घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू केली जाणार आहे.
  • – पुण्यात साखर संग्रहालय उभारणार
  • – संजय गांधी उद्यानात सफारीची पुनर्योजना
  • – रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न योजना. या योजनेसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद.
  • – धान्य साठवण्यासाठी 280 नवी गोदामे
  • – तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधी
  • – मोठ्या शहरात तेजस्विनी बस ज्यादा प्रमाणात उपलब्ध करून देणार
  • – पुण्यातील रिंग रोडसाठी 24 हजार कोटींची तरतूद
  • – 1 मे 2021 पासून, कौशल्य विकास योजना
  • – ‘सुंदर माझे कार्यालय योजना’ या योजनेंतर्गत सरकारी कार्यालयांचा कायापालट होणार. पुरस्कारही दिला जाणार
  • – आरोग्य विभागासाठी आर्थिक तरतूद
  • राज्याला तारण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार ?

Related Posts