IMPIMP

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी घेतली HM अमित शाह यांची भेट, सेनेच्या 2 नेत्यांची दिली नावं?

by pranjalishirish
sachin vaze arrest case devendra fadnavis met amit shah at navi delhi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयए नं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. या प्रकरणी भाजप आता आक्रमक होताना दिसत आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली अशी माहिती समजत आहे.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी एनआयए मार्फत करण्यासंदर्भात मागणी केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. राज्यातील भाजपचे नेते आणि खासदार देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची पुन्हा वेगळी बैठक पार पडली. सचिन वाझे प्रकरणात समाविष्ट असलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांविरुद्ध केंद्र सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील फडणवीसांनी केल्याचं समजत आहे.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली HM अमित शाह यांची भेट !

Related Posts