IMPIMP

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

by pranjalishirish
sachin vaze case bjp devendra fadnavis meets pm narendra modi and amit shah late last night

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयए नं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. राज्यात सुरू असलेल्या या प्रकरणामुळं दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणी भाजप आता आक्रमक होताना दिसत आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. सध्या फडणवीस दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. यानंतर त्यांनी पीएम मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली.

फडणवीसांनी घेतलेल्या या भेटीत राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचं समजत आहे. त्यामुळं राज्यात पुढं काय करायचं, याचा फायदा घेता येईल का ? अशी चर्चा या भेटीत झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपनं आपली मोट बांधली आहे. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे आमदार व खासदार देखील उपस्थित आहेत. यामुळं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्याचं दिसत आहे.

दरम्यान काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. वाझेंना पुन्हा पदावर घेण्यास उद्धव ठाकरेंनी दबाव आणला होता असा आरोप फडणवीसांनी केला होता. सचिन वाझे Sachin Vaze आणि परमबीर सिंग (Param Bir Singh) हे तर प्यादे आहेत. त्यांचे राजकीय सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

अंबानींच्या अँटिलिया इमारतीसमोर पोलीस अधिकाऱ्याकडूनच स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली जाते आणि त्यात मनसुख हिरेन यांची हत्या होते अशी घटना मुंबईच्या इतिहासात कधीच घडली नाही. रक्षकच भक्षक झालेत असा घणाघात फडणवीसांनी यावेळी बोलताना केला होता.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

Related Posts