IMPIMP

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

by bali123
sameer wankhede | ncb officer sameer wankhedes marriage invitation card fathers name dawood nilofer malik khan nawab malik marathi news sarkarsatta

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच आता या वादात मलिक यांची मुलगी निलोफर मलिक (nilofer malik khan) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका शेअर (wankhedes marriage invitation card) करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे (Dawood Wankhede) असे लिहिलेले आहे.

अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स (lokhandwala complex) येथे ७ डिसेंबर २००६ मध्ये समीर वानखेडे यांचा शबाना कुरेशी (shabana qureshi) यांच्याशी निकाह झाला आहे. या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये (marriage invitation card) समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे (Zahida Wankhede) यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख (sana malik shaikh) यांनीही विवाह दाखला शेअर केला असून ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे दिसत आहे.

 

 

पत्रिकेबाबत माहिती नाही – समीर वानखेडे

पत्रिकेसंदर्भात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी संपर्क साधला असता ती (wankhedes marriage invitation card)
जी निमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे ती आपली नसून पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांची आहे.
त्यामुळे त्यांनी काय छापले, काय नाही हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title – sameer wankhede | ncb officer sameer wankhedes marriage invitation card fathers name dawood nilofer malik khan nawab malik marathi news sarkarsatta

Related Posts