IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

by pranjalishirish
sanjay raut is not big leader that i should answer his all allegations says devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात एकामागून एक गंभीर प्रकरणे समोर येत असताना फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारकडून अहवाल मागवावा अशी मागणी राज्यपालांकडे केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याइतके ते मोठे नेते नाहीत, असा टोला लगावला.

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी राज्यपालांकडे जातात. कारण राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांच्याकडे बातम्या नसतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत, की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे. संविधानानुसार राज्यपाल हे प्रमुख आहे. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपचे कार्यकर्ते आणि तुम्ही कंबर वाकवून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

बदली प्रकरणावर बोलणं अडचणीचे ठरु शकतं

बदली घोटाळा प्रकरणावर मुख्यमंत्री कोणतेच भाष्य करत नाहीत. तसेच या संदर्भात सत्ताधाऱ्यांकडून बचाव केला जात आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले, या प्रकरणावर बोलणं मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरु शकतं, असे मत त्यांनी व्यक्त केले. फडणवीस पुढे म्हणाले, त्यांना माहित आहे की या प्रकरणावर बोलणं कठीण आहे. बोललो तर या प्रकरणाचा तपास करावा लागेल, तपास करण्याचे आदेश द्यावे लगतील. हे सर्व त्यांना करायचे नाही, त्यांना सरकार वाचवायचे आहे, हप्तेखोरीला पाठीशी घालण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र

मागील काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घटना गंभीर असल्याचे फडणवीस  Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. मुख्यमंत्र्यांचे हे मौन घातक आहे. शरद पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला, असंही फडणवीस यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस अस्तित्वातच नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दिल्लीतील नेते एक बोलतात, आणि इथले नेते वेगळं बोलतात. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आले आहेत बाकी काही नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला, काँग्रेसचा हिस्ता किती किंवा वाटा किती ?

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

राज्यपालांनी अहवाल मागवावा

बदली रॅकेट प्रकरणावर मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी त्यांना बोलते करावे. बदली रॅकेट प्रकरणात राज्य सरकारने काय कारवाई केली, याचा अहवाल राज्यपालांनी राज्य सरकारकडून मागवावा, अशी आमची मागणी असल्याचे भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

Aslo Read : 

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts