IMPIMP

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

by pranjalishirish
Jitendra Awhad | a molestation case registered against jitendra awhad ncp mla upset with article 354 against him

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – उच्च न्यायालयानं एप्रिल 2020 पासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) याचा कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सब्सक्राईबर डिटेल रेकॉर्ड (एसडीआर) जतन करण्याचे निर्देश मंगळवारी पोलिसांना दिले. इतकंच नाही तर न्यायालयानं आव्हाड यांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचेही सीडीआर आणि एसडीआर जतन करण्यास सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

सिव्हील इंजिनियर अनंत करमुसे यांचा दावा आहे की, आव्हाड Jitendra Awhad यांच्या ठाण्यातील बंगल्यात आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली. त्यांनी केलेल्या याचिकेवर न्या. एस एस शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुवावणी होती.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

8 एप्रिल 2020 रोजी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. मे 2020 मध्ये करमुसे यांनी याचिका दाखल करत आव्हाड यांनाही आरोपी करण्याची मागणी केली. इतकंच नाही तर हा तपास सीबीआयकडे वर्ग करावी अशीही मागणी केली. या घटनेला एक वर्ष झाल्यानं सीडीआर आणि एसडीआर आपोआप नष्ट होतील अशी भीती आबाद पोंडा यांनी व्यक्त केली.

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सूचना घेऊन सांगितलं आहे की, तपास अधिकारी जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad  आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर व एसडीआर जतन करतील. या प्रकरणी पुढील सुनावणी ही 2 एप्रिल रोजी होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

Related Posts