IMPIMP

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण; शरद पवारांनी घेतली ‘ही’ विशेष खबरदारी

by sikandershaikh
Sharad Pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागल्याने सरकारची धावपळ उडाली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील काही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाढत्या कोरोना महामारी संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित करून काळजी घेण्याचे आवाहन केले. या सर्वाचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विशेष खबरदारी घेत असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या नेत्यांनी मागील काही दिवसात अनेक बैठका घेतल्या आहेत, विविध कार्यक्रमांना आणि लग्न सोहळ्यांना हजेरी लावली आहे. यानिमित्ताने ते एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत.
रविवारीच मंत्री छगन भुजबळ हे देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आले होते, त्यामुळे खबरदारी म्हणून पवारांनी 1 मार्चपर्यंत
आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
ही माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
दरम्यान, शरद पवार (sharad pawar) यांनी आपण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहन प्रतिसाद म्हणून पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याचे ट्विट केले आहे.

काल राज्यातील जनतेला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
म्हटले होते की, मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा.
राज्यात गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच
नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे
निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सकाळी संचारबंदीची घोषणा, रात्री नियमांचे उल्लंघन ! पुण्यात शाही विवाह सोहळ्यात सर्व पक्षीय दिग्गजांनी उडविला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Related Posts