IMPIMP

शरद पवार यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकणार’

by omkar
Sharad Pawar

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील महाविकास आघाडीबाबत (mva government) मोठ विधान केले आहे. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो अस कोणाला पटल नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला अन् त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावल टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार (mva government) राज्यात चांगल काम करत आहे. राज्यातील हे सरकार पुढचे 5 वर्ष टीकणार (mva government will complete 5 year) असा ठाम विश्वास पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे.

Vishwas Nangre-Patil | मुंबईतील इमारत दुर्घटनाप्रकरणी इमारत मालक, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार – विश्वास नांगरे-पाटील

इतकेच नव्हे तर लोकसभा, विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेच देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही, असे पवार यांनी म्हटल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 22 व्या वर्धापदिनी गुरुवारी (दि. 10) मुंबईत आयोजित कायर्क्रमात शरद पवार बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेतली.
त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेंव्हा अनेकांनी शंका घेतली.
पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केल नही. पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे.
माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच असल्याचे म्हणत पवारांनी पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर भाष्य केले आहे.

Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

देशात जनता पक्षाचे राज्य आले. त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सर्वत्र कॉंग्रेस पराभूत झाली, असे असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली.
शिवसेनेने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला, अशी आठवण पवारांनी सांगितली.
बाळासाहेबांनी इंदिराजींना दिलेला शब्द निवडणुक न लढवत पाळला.
त्यामुळे कोणी काही शंका घेतली तरी शिवसेनेने त्या कालखंडात ज्या पद्धतीने भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी केल जाईल, असे कोणी म्हणत असेल तर तसे होणार नाही.
या देशात अनेकांनी पक्ष काढले काही टिकले काही कुठे गेेले हे कळाले नाही.
पण राष्ट्रवादी हा गेल्या 22 वर्षापासून ताकदीवर उभा आहे.
पक्षातून काही लोक गेले पण नवीन नेतृत्व तयार झाले. राजकारणात सतत नव्या नेतृत्वांना संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार

Web Title: Sharad Pawar’s firm belief, said – ‘Mahavikas Aghadi’ government will last 5 years’

Related Posts